Pune Crime News | आंदेकर टोळीतील 8 महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने केले कोयत्यासह जेरबंद

Pune Crime News | A team from Unit 1 of the Crime Branch apprehended a notorious criminal a member of the Andekar gang who had been absconding for eight months and seized a sickle from him.

पुणे : Pune Crime News |  बंडु आंदेकर टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून फरार  असलेल्या  रेकॉर्डवरील गुंड सोलापूर बाजार परिसरात आल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून त्याला कोयत्यासह अटक केले. (Andekar Gang News)

ओम गणेश नगरकर Om Ganesh Nagarkar (वय २४, रा. यश रेसिडन्सीचे टेरेसवर, हडपसर गाव) असे या गुंडाचे नाव आहे.

बंडु आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर याचा खुन केला होता. समर्थ पोलीस ठाण्यात बंडु आंदेकर टोळीमधील ओम नगरकर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून गेली ८ महिने फरार होता.

आंदेकर टोळी, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे या टोळीतील सक्रिय गुंड आणखी गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असून त्यांच्या रोज शोध घेऊन त्यांच्या कार्यवाही कर.वी़ त्यांच्याकडून कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सुचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार ८ जून रोजी युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्याचे सहकारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आंदेकर टोळीतील फरार सोलापूर बाजार येथील कॅनॉल परिसरात आला आहे. याची खात्री करुन पोलीस पथकांनी सापळा रचून ओम नगरकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता व मोबाईल मिळून आला. लष्कर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश् संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयुर भोसले, अविनाश दळवी यांनी केली आहे.

You may have missed