Pune Crime News | दिवे घाटात फिरणार्या दोघा गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने पकडून 2 पिस्टल, 11 जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | दिवे घाटात फिरणार्या दोघा गुंडांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडून त्यांच्याकडून २ पिस्टल व ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
यश महेश मोडक Yash Mahesh Modak (वय २३, रा. माणिकनगर, वाघजाई वस्ती, मांजरी), गौरव आण्णा नेटके Gaurav Anna Netke (वय २२, रा. सटवाईनगर, मांजरी) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व पोलीस अंमलदार हे मांजरीमधील दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना बातमीदाराने बातमी दिली की, रेकॉर्डवरील दोघे जण दिवे घाट या ठिकाणी फिरत असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक दिवे घाटात गेले. विठ्ठलाच्या मुर्तीच्या अलीकडे २० मीटर घाटाच्या दिशेला दोन संशयित मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यश मोडक, गौरव नेटके यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे, २ मोबाईल असा एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, समीर पांडुळे, झाकीर पठाण, सतिश वणवे, शेखर काटे, गणेश माने, उमेश शेलार, अनिल जामगे, पल्लवी मोरे, अश्विनी गायकवाड लोखंडे यांनी केले आहे.
