Pune Crime News | एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्यातील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | Crime Branch Unit 4 team apprehends MCOCA accused absconding for a year.

पुणे : Pune Crime News | शस्त्राने गंभीर दुखापत केलेल्या गुन्ह्यात मोक्का कारवाई झालेल्या व एक वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या नव्या जागेतून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

कुणाल ऊर्फ सोन्या संजय चांदणे Kunal alias Sonya Sanjay Chandne (वय २३, रा. भिमज्योत मित्र मंडळाजवळ, येरवडा, सध्या रा. ग्रीन अ‍ॅव्हेन्यू, गोंधळेनगर, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.  

कुणाल चांदणे हा सराईत गुन्हेगार असून येरवडा परिसरात तोडफोड, मारहाणीच्या अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग दिसून आला होता. त्याला २ वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते. गेल्या वर्षी त्याच्यावर शस्त्राने मारहाण करुन जखमी केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो फरार झाला होता.

गुन्हे शाखेकडील युनिट ४ च्या पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार हे समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमजद खान व तुषार खराडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील आरोपी कुणाल हा हडपसरमधील गोंधळेनगर येथील कॅनॉलजवळ  नव्या जागी रहात आहे. या माहितीची खातरजमा करुन पोलीस पथक ग्रीन अ‍ॅव्हेन्यु येथे गेले. तेथील घरी कुणाल चांदणे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. त्याला येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, एकनाथ जोशी, अमजद खान, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, नितीन साबळे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, वैभव रणपिसे, विशाल इथापे, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केले आहे.

You may have missed