Pune Crime News | रस्त्यावर खेळणार्‍या मुलांंनी न ऐकल्याने शिवीगाळ केल्यावरुन तरुणाला बेदम मारहाण करुन केले गंभीर जखमी; केशवनगरमधील घटना  

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लहान मुलांना रस्त्यावर खेळू नका, असे सांगितल्यावर ती उलट बोलली. त्यातून त्यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन मुलांच्या घरातील लोकांनी तरुणाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विटांनी मारुन गंभीर जखमी केले.

याबाबत गणेश नागनाथ जाधव (वय २६, रा. केशवनगर, शेवटचा बसस्टॉप, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिवा चौधरी, अमरेज शिवा चौधरी (Amrej Shiva Chaudhary), यलप्पा शिवा चौधरी (Yalappa Shiva Chaudhary), राजू शेख, दिलशाद राजू शेख (Dilshad Raju Shaikh), सरताज राजू शेख Sartaj Raju Shaikh (सर्व रा. शेवटचा बसस्टॉप, केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे ससून रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता घरी जात असताना लक्ष्मी चौधरी यांच्या घरातील लहान मुले तसेच वस्तीमधील इतर लहान मुले रोडवर खेळत होती. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना रोडवर गाड्या येतात, रोडवर खेळू नका, असे म्हणाले. तेव्हा ती लहान मुले त्यांना उलट बोलली. तेव्हा त्यांनी तुम्ही तुमची +++ घरी घाला, असे म्हणाले. ते लक्ष्मी चौधरी हिने एकून आमच्या लहान मुलांना शिवीगाळ करतो का, असे म्हणून वाद घातला. तेव्हा फिर्यादी यांनी माफी मागून वाद मिटवुन मावशीच्या घरी गेले. रात्री घरी परत आले. तेव्हा शिवा चौधरी याने त्याची पत्नी लक्ष्मी चौधरी हिच्याबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन खाली पाडले. इतर मुले अमरेज चौधरी, यल्लपा चौधरी या दोघांनी रस्त्यावरील विटाने फिर्यादी यांच्या डोक्यात, छातीत व बरगडीवर मारहाण केली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून फिर्यादी यांची बहिण रुपाली चौगुले तिचा दीर विनोद चौगुले, भावाची बायको सुरेखा जाधव यांनी भांडणे सोडवली. फिर्यादी यांना घेऊन ससून रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना अति दक्षता विभागात दाखल करुन उपचार सुरु केले. फिर्यादी यांच्या डोक्याला, डाव्या बरगडी वर अवघड जागेवर मार लागलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करीत आहेत

You may have missed