Pune Crime News | मुलांची आठवण आल्याने भेटायला गेलेल्या तरुणाला सासरच्याकडील लोकांनी दगड, बांबुने मारहाण करुन केले जखमी
पुणे : Pune Crime News | पतीपत्नी वेगळे रहात असल्याने मुलाची आठवण आल्याने त्यांना भेटण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेलेल्या तरुणाला सासरकडील लोकांनी बांबु व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत नारायण पांडुरंग जानकर (वय ४८, रा. किष्कींदानगर, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुरी नारायण जानकर Mayuri Narayan Jankar (रा. किष्कींदानगर, कोथरुड), सुरेश लक्ष्मण बावदाने (Suresh Laxman Bavdane), महेश लक्ष्मण बावदाने (Mahesh Laxman Bavdane), संगिता महेश बावदाने (Sangita Mahesh Bavdane), भगवान बाबु मरगळे (Bhagwan Babu Margale), लक्ष्मण राया बावदाने Laxman Raya Bavdane (सर्व रा. सुतारदरा, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कर्वे रोड वरील ग्रील लाईन समोर, सुतारदरा येथील मैदान,महेश बावदाने यांचे घर व मयुरी जानकर यांचे किष्कींदानगर येथील घर येथे ८ ते ११ मे २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी मयुरी व मुले एकत्र रहात नाहीत़ त्यांना मुलांची आठवण आल्याने जानकर यांनी महेश बावदाने यांना मुलांना भेटायचे आहे, असे सांगितले. त्यांनी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी भेटण्यास गेले असता मयुरी जानकर व भगवान बाबु मरगळे हे पाठोपाठ आले. फिर्यादी हे सोबत रहात नसल्याचा राग धरुन त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर महेश बावदाने हे मुलांना भेटण्यासाठी फिर्यादींना रिक्षातून घेऊन गेले. ते घरी घेऊन न जाता रिक्षा मोकळ्या जागेत नेली. तेथे महेश बावदाने व भगवान मरगळे यांनी दगडाने व बांबुने मारहाण केली. त्यांचा मोठा मेव्हणा सुरेश बावदाने व लक्ष्मण बावदाने यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादी यांना घरात कोंडुन ठेवले होते. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.
