Pune Crime News | पुणे : बिबवेवाडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात सुरु होता वेश्या व्यवसाय, 2 तरुणींची सुटका करुन महिला मॅनेजरला अटक
पुणे : Pune Crime News | बिबवेवाडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात उपचाराऐवजी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून २ तरुणींची सुटका केली. तेथील महिला मॅनेजरला अटक केली आहे.
याप्रकरणी ३० वर्षीय (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडीतील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू आहे. तेथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती बातमी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या नेतृत्वाखाली बातमीची पडताळणी करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. त्या ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्रावर छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या २ तरुणींची सुटका केली. हे उपचार केंद्र चालविणार्या महिलेला अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोीलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमोल रसाळ, कोंडे, इंगळे यांनी केली आहे.
