Pune Crime News | क्रिप्टो करन्सी देण्याचा बहाणा करुन तरुणाला बोलावुन लुबाडणार्‍या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करणार्‍या तरुणाला बोलावून त्याला क्रिप्टो करन्सी देण्याचा बहाणा करुन रोकड सह मोबाईल, दुचाकी असा २ लाख ८५ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या टोळक्यापैकी विमानतळ पोलिसांनी एकाला जेरबंद केले आहे.

प्रणय अमर बुवा Pranay Amar Bua (वय १९, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. बुवा याचे साथीदार जतीन, अर्श सय्यद आणि जतीन याच्या ओळखीचा असे चौघांवर  गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अब्दुलाह अनिस शेख (वय १८, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुलाह शेख व त्यांचा मामाचा मुलगा काशिफ सलीम मोमीन (वय १९) हे एकत्र राहतात. त्याचे १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले असून तो कॉलेजला प्रवेश घेणार आहे. तो क्रिप्टो ट्रेडिंग करीत असतो.  १० मे रोजी रात्री ११ वाजता प्रणय बुवा या मित्राचा फोन आला. त्याने माझ्याकडे १४९० युएसडीसी कॉईन्स देतो, तु रोख पैसे घेऊन ये. त्याप्रमाणे तो व मामाचा मुलगा काशिफ मोमीन हे दुचाकीवरुन चंदननगर येथील बॉलीवूड थिएटरच्या जवळील लाल मातीच्या ग्राऊंडमध्ये गेले. त्या ठिकाणी प्रणय भेटला . त्याच्याबरोबर जतीन व त्याचे दोन मित्र होते. जतीन याने पैसे पाहिल्यावरच माझे मित्र कॉईन ट्रान्सफर करतील. त्यानुसार त्यांनी डिक्कीत ठेवलेले पैसे पाहिले. त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील १ लाख ४० हजार रुपये, मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने घेऊन ते पळून गेले. त्यामुळे हे सर्व जण घाबरलेले असल्याने त्यांनी तक्रार दिली नाही.

प्रणय याला वारंवार संपर्क केला. त्यावेळी त्याने तू टेन्शन नको घेऊ, तुमची गाडी मोबाईल व पैसे परत करतो, असे सांगितले. तरीही त्याने ते परत केले नाही, शेवटी त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे तपास अधिकारी नितीन राठोड यांना आरोपींना शोधण्याचा आदेश दिला. पोलिसांनी प्रणय बुवा याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने जबरदस्तीने काढून घेतलेल्या पैकी २५ हजार९४० रुपये रोख, ९० हजारांचा अ‍ॅपलचा मोबाईल फोन,  दुचाकी असा १ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कºहे, रमेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार व सागर कासार यांनी केली आहे.

You may have missed