Pune Crime News | रिक्षातून गांजाची विक्री करणारे रॅकेट उद्धवस्त, 35 किलो गांजा, रिक्षासह 8 लाखांचा माल जप्त

Pune Crime News | Racket selling ganja from rickshaw busted, 35 kg ganja, goods worth Rs 8 lakh seized including rickshaw

पुणे : Pune Crime News |  रिक्षातून गांजाची विक्रीसाठी वाहतूक करणार्‍या दोन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी ३५ किलो गांजा व २ रिक्षा असा ८ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. रिक्षातून गांजाची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

https://www.instagram.com/p/DYb3Er0Jl3O

चारुदत्त काळुराम चव्हाण Charudatta Kaluram Chavan (वय २५, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे त्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस गस्त घालत असताना काही दिवसांपूर्वी रिक्षातून गांजा विक्री केली जात असल्याचे समजले. त्यावरुन त्यांनी एक रिक्षाचालक व रिक्षा जप्त केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत होते. पोलीस १४ मे रोजी पेट्रोलिंग करीत असताना रात्री ११ वाजता आंबेगाव येथील चिंतामणी ज्ञानपीठाकडून हायवेकडे येणार्‍या सर्व्हिस रोडवर त्यांना एक रिक्षा दिसली. पोलिसांनी चारुदत्त चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षामधून २ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन आल्याचे दिसून आले. त्यास रिक्षा व गांजासह ताब्यात घेतला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़ त्याच्याकडील चौकशीत त्याने लपवुन ठेवलेला ६ लाख ४५ हजार रुपयांचा ३३ किलो गांजा जप्त केला आहे. त्यातून रिक्षातून गांजा विक्री करणारे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे यांनी केली आहे.

You may have missed