Pune Crime News | वाईन शॉपची कॅश घेऊन जात असलेल्या ऑफिस बॉयला कोयत्याचा धाक दाखवून 4 लाख रुपये नेले लुटून

crime

पुणे : Pune Crime News |  वाईन शॉप दुकानातील जमा झालेली रोकड मालकाच्या घरी घेऊन जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ४ लाख रुपयांची रोकड ऑफिस बॉय कडून लुटून नेली.

याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड ) याने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नर्‍हे पोलिसांनी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना  बंगलोर – मुंबई महामार्गावरील एच पी पेट्रोलपंपाचे समोर मुंबईकडे जाणार्‍या लेनवर १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा डी एस पी वाईन या  मद्य विक्री दुकानात कामाला आहे. मद्य विक्री दुकानात जमा झालेली ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन तो १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओला मोटार सायकलवरुन मालकांच्या घरी देण्यासाठी निघाला होता. बंगळुरू मुंबई  बाह्यवळण मार्गावर नर्‍हे परिसरात दुचाकीस्वार कांबळे याला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखवला. त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन  ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड हिसकावून चोरटे पसार झाले.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून त्या आधारे माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.