Pune Crime News | एम डी ड्रग्जची विक्री करणार्‍या दोघांना पकडून विमानतळ पोलिसांनी पावणे सत्तावीस लाखांचा माल केला जप्त

Pune Crime News | Viman Nagar police arrest two people selling MD drugs, seize goods worth Rs. 27 lakhs

पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांची ८ ग्रॅम एम डी पावडर, कार आणि दुचाकी असा माल जप्त केला आहे.

प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी Pritam Prafulla Kulkarni (वय ३७, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी) आणि उबेद अन्सार खान Ubaid Ansar Khan (वय २७, रा. गायकवाड सोसायटी, अमिना मंझिल सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक ८ एप्रिल रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार हरी पुंडे आणि लालु कर्‍हे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणार्‍या रोडवर  एक जण  एम डी ड्रग्जची विक्री करीत आहे. त्याची शहानिशा करुन तपास पथकाने सापळा रचून प्रितम कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ ग्रॅम ५९ मिली ग्रॅम एम डी पावडर व मोटारसायकल जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात उबेद खान याचे नाव निष्पन्न झाले. तो खुळेवाडी परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून ४ ग्रॅम एम डी पावडर व एक स्कॉर्पिओ  कार जप्त केली. दोघांकडून मिळून एकूण २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वय पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कºहे, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार, अंबादास चव्हाण यांनी केली आहे.