Pune Crime News | बॉडी बिल्डिंगसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदा विक्री करणार्‍यास तरुणाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद; 82 बाटल्या केल्या जप्त

Pune Crime News | Anti-Extortion Squad arrests youth for illegally selling drugs used for body building; 82 bottles seized

पुणे : Pune Crime News | सराईत गुन्हेगाराने नशेकरीता वापरले जाणार्‍या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन टर्मिवा  (MAPHENTERMINE SULPHATE INJECTION) या प्रतिबंधक इंजेक्शनची विक्री करीत असल्याच्या माहिती वरुन खंडणी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून तब्बल ८२ बाटल्या जप्त केल्या आहेत.

अभिषेक खंडु भडंगे Abhishek Khandu Bhadange (वय २५, रा. वलई सोसायटी, हिंगणे मळा, हडपसर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

मेफेंटरमाइन सल्फेट या औषधाचा नशेसाठी बेकायदेशीरपणे वापर केला जातो. तसेच जिम आणि बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक तरुण व्यायाम करताना थकवा जाणवू नये, ताकद आणि उर्जा वाढावी, यासाठी वापर करतात.

खंडणी विरोधी पथक परिमंडळ ६ मध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अभिषेक भडंगे हा नशे करीता वापरले जाणारे मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करीत आहे. या बातमीनुसार पोलिसांनी हडपसर येथे पोहचले असता पोलिसांना पाहून अभिषेक पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्याकडून २७ हजार ४५३ रुपयांची मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन च्या एकूण ८२ बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, किरण पडयाळ यांनी केली आहे.

You may have missed