Pune Crime News | हाताचे रक्त दाखवून तो म्हणाला,‘‘आताच एकाचा गेम वाजवून आलोय’’; हॉटेलमध्ये तरुणाच्या  खुनाचा प्रयत्न केलेल्या राज पवार टोळीने फुकट पेट्रोल न दिल्याने कर्मचार्‍यांना मारहाण करुन  पेट्रोल पंपावर घातला राडा

Pune Crime News | Showing blood on his hands, he said, "I just played a game"; Raj Pawar gang, who tried to murder a young man in a hotel, beat up employees and staged a protest at a petrol pump for not giving free petrol

पुणे : Pune Crime News |  कवडी पाट टोलनाक्यावरील सागर रेस्ट्रॉरंटमध्ये तू आमच्याकडे का पाहतो, असे म्हणून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खुनाचा प्रयत्न केल्यानंतर राज पवारच्या टोळीने कदमवाक वस्ती येथील पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल न दिल्याने कार्मचार्‍यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी राज रवींद्र पवार Raj Ravindra Pawar (वय २९), प्रेम तानाजी गायकवाड Prem Tanaji Gaikwad ( दोघे रा. कवडीपाट टोल नाका, कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) यांच्यासह त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टलगत इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर १६ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.

याबाबत मॅनेजर प्रतिक किसनराव सोळुंके (वय २१, रा. कदम वाक वस्ती, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक सोळुंके हे नंदकिशोर काळभोर यांच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतात. १६ मे रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास  गुजर वस्ती येथे रहावयास असलेले राज पवार, प्रेम गायकवाड व एक साथीदार असे तिघे जण दुचाकीवरुन आले. त्यांनी पंपावरील कामगार सिद्धार्थ आव्हाड याला शिवीगाळ करुन आम्ही या भागातील भाई आहोत, आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाक व टाकी फुल कर, पैसे मागायचे नाहीत, अशी सिद्धार्थला धमकी दिली. सिद्धार्थ याने पेट्रोल टाकण्यास नकार दिला. तेव्हा राज पवार याने कोयता काढ रे ह्याला लय माज आला आहे, ह्याचा गेमच करुन टाकतो, अशी धमकी दिली. त्यावर सिद्धार्थ याने घाबरुन गाडीत पेट्रोल भरुन गाडीची टाकी फुल केली. त्यावेळी मॅनेजर प्रतिक साळुंखे व सागर  मुसळे हे तिथे आले. प्रेम गायकवाड याने हाताला  लागलेले रक्त त्यांना दाखवुन “आताच एकाचा गेम करुन आलोय, तुझा पण करु का,” असे बोलून गाडीला लावलेला कोयता त्यांना दाखवला. यापुढे आम्ही ज्या वेळेस गाडी घेऊन येऊ, त्यावेळीच आमचे गाडीत गप पेट्रोल भरायचे व आम्हाला पैसे मागायचे नाहीत, असे बोलून निघून गेले. ही मुले मारतील, या भितीने त्यांनी तक्रार दिली नव्हती. त्यानंतर ते गावाला गेले होते. त्यांना पकडल्याचे समजल्यानंतर त्यांनी आता तक्रार दिली आहे.

या घटनेपूर्वी सागर बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये प्रसाद दिलीप शेंडगे (वय ३०, रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाक वस्ती) यांना आमच्याकडे का पाहतो, या कारणावरुन बिअरची बाटली डोक्यात, छातीवर, नाकावर, कानावर व गळ्यावर मारुन गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात पोलिसांनी  राज रवींद्र पवार, प्रेम तानाजी गायकवाड, सौरभ सुनिल गायकवाड, राहुल घाडगे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन राज व प्रेम यांना अटक केली आहे. दोघांना या गुन्ह्यात वर्ग करुन घेणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले.

You may have missed