Pune Crime News | काळेपडळ पोलिसांची हातभट्टी दारुवर मोठी कारवाई; 5 लाख 23 हजारांची हातभट्टी दारु केली जप्त

Pune Crime News | Kalepadal police take major action against hand-made liquor; Hand-made liquor worth Rs 5 lakh 23 thousand seized

पुणे : Pune Crime News | कारमध्ये हातभट्टी दारुचा साठा करुन तिची ओळखीच्या लोकांना विक्री करणार्‍या काळे पडळ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २४५० लिटर हातभट्टीची दारुचे एकूण ७० प्लास्टिकचे ड्रम, कार असा ५ लाख २३ हजार रुपंयाचा माल जप्त केला आहे.

सुनिल हरि कचरावत Sunil Hari Kachrawat (वय ५०, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण सातवनगर येथील मोकळ्या जागेत त्याच्याकडील कारमध्ये हातभट्टीचा साठा करुन त्याच्या ओळखीच्या लोकांना दारु विक्री करीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून सुनिल कचरावत याला पकडले. त्याच्या कारमध्ये काही दारुचे ड्रम होते. त्याबरोबरच शेजारी असलेल्या झुडपामध्ये त्यांनी अनेक ड्रम भरुन दारु ठेवली होती. तीही जप्त करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, गिरीराज जगदाळे , प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी केली आहे.

You may have missed