Pune Crime News | परवागनी नसताना सिंहगड व्हॅली प्रकल्पाला परवानग्या असल्याचे दर्शवून प्लॉट देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या रवींद्र रजपुत, अशिष कचरावत यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सिंहगड व्हॅली नावाने प्रकल्प तयार करुन त्याला शासकीय परवानगी असल्याचे भासवुन त्यातील २ प्लॉटच्या व्यवहारापोटी दिलेल्या रक्कमेपैकी १९ लाख रुपये परत न करताना फसवणूक केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघा जमीन मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र रजपुत (वय ४५), अशिष कचरावत (वय ४०), कल्पेश माणिकचंद मंडलेचा Kalpesh Manikchand Mandlecha (वय ४०, रा. ज्ञानेश सोसायटी, वारजे) आणि राजेंद्र शंकर भोसले Rajendra Shankar Bhosale (वय ४०, रा. वसंतनगर, केळेवाडी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत यशवंत दगडु भिलारे (वय ६७, रा. आसावरी, नांदेडसिटी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हवेली तालुक्यातील वडदरे येथील भुमापन क्रमांक व उपविभाग ६८९ येथे २०१९ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र रजपूत आणि अशिष कचरावत यांनी सिंहगड व्हॅली नावाचा प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाला शासकीय परवानग्या, मंजुरी नसताना त्यात परवानग्या असल्याचे भासवले. फिर्यादी यांनी या प्रकल्पातील ५ हजार चौरस फुट हे दोन प्लॉट विकत घेण्याचे ठरवले. त्याचा ३५ लाख रुपयांचा व्यवहार केला. प्रकल्पाच्या ठिकाणी कल्पेश मंडलेचा व राजेंद्र भोसले हे काम पहात होते. फिर्यादी यांना खोट्या पावत्या दिल्या. या प्रकल्पाला शासकीय परवानग्या, मंजुरी नसताना फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तो व्यवहार रद्दलेख करुन दिलेले २० लाख रुपये परत मागितले. त्यांना ३० मार्च २०२४ ते ३० मार्च २०२५ पर्यंतचे एकूण १४ धनादेश दिले. त्यापैकी केवळ १ लाख रुपयांचा एक धनादेश वटला. बाकीचे सर्व १९ लाख रुपयांचे धनादेश न वटता परत आल्याने शेवटी यशवंत भिलारे यांनी आता फसवणूकीची फिर्याद दिली आहे. त्यावरुन उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

You may have missed