Pune Crime News | जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरुन पिस्तुलातून गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; रेकॉर्डवरील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News | Attempt to kill by shooting with pistol for not withdrawing old case; Khadki police arrest criminals with records

पुणे : Pune Crime News | जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरुन दोघा रेकॉर्डवरील गुंडांनी दोघा तरुणांना मारहाण करुन त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक केली आहे.

सुर्दशन अरविंद आडसुळ Surdashan Arvind Aadsul (वय २०, रा. जुनी तालीम जवळ, गवळीवाडा, खडकी), चिन्मय कैलास मोगलChinmaya Kailash Mogul  (वय २३, रा. मॅक्समेरी हॉस्पिटल, इंडियन पेट्रोल पंप, कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. महादेववाडी, खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खडकी येथील राजीव गांधीनगर, बुद्ध विहाराजवळील रेल्वे मार्गाजवळ १५ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. फिर्यादी यांचे आरोपीबरोबर या पूर्वी भांडणे झाले होती. त्याची त्यांनी केस दाखल केली होती. ही केस मागे न घेतल्याने त्याचा या दोघांना राग होता. फिर्यादी व त्यांचे मित्र हे मोटारसायकलवरुन राजीव गांधी नगर येथे आले. तेव्हा चिन्मय हा ओरडत आला. हेच ते चांदणे गँगचे मेंबर आहेत. बघतो काय सुद्या घाल गोळ्या, असे ओरडला. त्यावर सुदर्शन याने चिन्मय याच्या कमरेचे पिस्टल काढून हे केस मागे घेत नाही का, तुमच्या **  ग़ोळ्या घालतो, असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु, त्यांना नेम चुकला. त्यानंतर पिस्टल हवेत दाखवत ‘‘आज नही तो कल, सबका हिसाब होगा, भाई वापस आएगा’’ असे म्हणून धमकी देऊन दहशत पसरवुन ते निघून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक किरण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, फिरोज खान यांनी घटनास्थळी भेट दिली़ खडकी पोलिसांनी दोघा रेकॉर्डवरील गुंडांना अटक केली आहे.

You may have missed