Pune Crime News | आर्थिक फसवणूक करुन 3 वर्ष फरार असणार्‍या गुन्हेगाराला नवी मुंबईतून चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Criminal who was absconding for 3 years due to financial fraud arrested by Chandannagar police from Navi Mumbai

पुणे : Pune Crime News | वेगवेगळी कारणे सांगून लोकांकडून पैसे, दागिने घेऊन फसवणूक करुन फरार झालेल्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी ३ वर्षांनी  नवी मुंबईतून जेरबंद केले आहे.

दत्तात्रय बबन तावरे Dattatreya Baban Taware (वय ३७, रा. कोल्हेवाडी, रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा, सध्या  रा. तुकाराम नगर, खराडी) असे या चोरट्याचे नाव आहे.

दत्तात्रय तावरे याने फिर्यादीकडून १८ डिसेंबर २०२२ मध्ये पोल्ट्री व्यवसायासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करुन २ दिवसाकरीता फिर्यादीच्या पत्नीचे साडेतीन तोळ्याचे गंठण कार्यक्रमासाठी घेतले. ते दागिने परस्पर मणप्पुरम गोल्ड लोन, चंदननगर शाखेत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी गहाण ठेवुन त्यावर १ लाख २९ हार ५०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेऊन तो फरार झाला. त्यांच्या प्रमाणे आणखी तिघांना याच पद्धतीने त्याने फसवणूक केली होती.

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याबरोबर दत्तात्रय तावरे हा फरार झाला होता. त्याने त्याचे वास्तवाचे पत्ते बदलले. तसेच त्याने त्याचा मोबाईल क्रमांक व बँक खातीही वापरणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा शोध लागू शकत नव्हता. सहायक पोलीस निरीक्षक महेश  लामखडे, पोलीस अंमलदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा सध्याचा ठावठिकाणा सानपाडा, नवी मुंबई असा असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी सानपाडा येथे तो रहात असलेला  परिसर१४ मे रोजी पिंजुन काढला. बातमीदाराच्या मदतीने दत्तात्रय तावरे याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार किरण घुटे, विक्रम गायकवाड यांनी केले आहे़

You may have missed