Pune Crime News । पूर्ववैमनस्यातून दोघा भावंडांच्या डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमधील घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । नातेवाईकाच्या अत्यंविधीला जाणार्‍या दोघा भावंडांवर पूर्ववैमनस्यातून दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७), ऋषिकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरमान समीर शेख (वय २५), शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केटयार्ड)  यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आशुतोष याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष आणि ऋषीकेश यांच्या नातेवाईकांचे २६ जुलै रोजी निधन झाले. दोघे जण अंत्यविधीसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केट यार्डातील डॉ. आंबेडकरनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी दोघांना अडवले. वैमनस्यातून आरोपींनी आशुतोष याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.  ऋषिकेश याला शाहरुख याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला वार केला. हातावर वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक बसवराज माळी तपास करीत आहेत.

You may have missed