Haj Committee Of India News । हज यात्रा २०२७ साठी देशभरातून १ लाख ९८ हजार अर्ज हज कमिटीकडे दाखल

Haj Committee Of India News | For the Haj journey 2027, 1,98,000 applications have been submitted to the Haj Committee from across the country

पुणे :  Haj Committee Of India News ।   हज यात्रा २०२७ ची तयारी सुरु झाली असून भारतभरातून हज कमिटीकडे आतापर्यंत १ लाख ९८ हजार ८७० अर्ज आले आहेत़ त्यात महाराष्ट्रातून २७ हजार ६९९ अर्ज आले आहेत.

हज यात्रेसाठी आलेल्या अर्जाची माहिती जाहीर करण्यात आली. यावेळी सहसचिव मोहम्मद अफजल, हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहानावास सी, उप कार्यकारी अधिकारी मोहम्मद नियास अहमद, सदाकत अली, हैदरपाशा व इतर अधिकारी उपस्थित होते.

या वर्षी २०२६ मध्ये भारतातून हज यात्रेसाठी १ लाख ७५ हजार यात्रेकरु गेले होते. त्यात ७० टक्के यात्रेकरु हजर कमिटीद्वारे तर ३० टक्के यात्रेकरु खासगी ऑपरेटरद्वारे गेले होते. २०२७ च्या हज यात्रेसाठी भारताला साधारण पावणे दोन लाख यात्रेकरुचा कोटा निश्चित होण्याची शक्यता आहे.

यंदा आलेल्या अर्जांमध्ये १ लाख ६८ हजार ६४५ अर्ज हे सर्वसाधारण गटात आले आहेत. वय ६५ वर्षांपेक्षा अधिक असलेल्या गटामध्ये १९ हजार ३८८ अर्ज आले आहेत. सर्व साधारण गटात बॅकलोगमध्ये ५ हजार ५७९ अर्ज आले आहेत. ४५ वयोगटातील महिला राखीव कोट्यासाठी ४ हजार १७७ अर्ज तर, ६५ वयोगटातील महिला राखीव कोट्यासाठी १ हजार ८२ अर्ज आले आहे. सर्वसाधारण गटात सर्वाधिक यात्रेकरुंचे अर्ज आले असल्याने येथे जास्त स्पर्धा दिसून येत आहे.

महाराष्ट्रातून एकूण २७ हजार ६९९ अर्ज आले आहेत. सर्व साधारण गटात २३ हजार ९९२ अर्ज आले आहेत. ६५ वयोगटामध्ये ३००४ आणि ६५ वयोगटात महिला राखीवमध्ये १४ तर ४५ वयोगटामधील महिला राखीवसाठी ९८ अर्ज आले आहेत. या अर्जामधून हज कमिटी यात्रेकरुंची प्राथमिक निवड यादी लवकरच जाहीर करणार आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शहानवाज सी यांनी सांगितले की, पहिला हप्ता एक लाख ५२ हजार ३०० रुपये भरण्यासाठी  उद्यापासून पोर्टल सुरू होणार आहेत तर हज यात्रेकरू यांनी लवकरात लवकर पहिला हप्ता भरावा.  सौदी अरेबिया यांनी मीना च्या टेनच्या जागेसाठी लवकरात लवकर पैसे भरून जागा बुक करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे.

You may have missed