Pune Crime News | एकाच फ्लॅटवर दोनदा गृहकर्ज काढून फ्लॅट बळकाविणार्या पितापुत्रावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | फ्लॅट देण्याची दस्त नोंदणी केल्यानंतर त्या फ्लॅटवर दोनदा गृहकर्ज घेऊन त्या कर्जाचे हप्तेही न भरता फ्लॅट बळकाविणार्या पितापुत्रांवर आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोहन वसंत दहिभाते (वय ३४, रा. गाढवे कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विजय जयवंत भापकर Vijay Jaywant Bhapkar (वय ३८), जयवंत मारुती भापकर Jaywant Maruti Bhapkar (वय ६०, दोघे रा. साई गणेश विहार, आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार साई गणेश विहार येथे २५ मे २०१७ रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व जयवंत भापकर यांच्या मालकीच्या जमिनीवर श्री साइे गणेश कंन्ट्रक्शन कंपनीचे स्कीममध्ये दुसर्या मजल्यावरील ९४५ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका व कार पार्किंग मालकी हक्काने अभिहस्तरण करारनामा सह दुय्यम कार्यालयात दस्त नोंदणी करुन करण्यात आला. त्यावर टाटा कॅपिटल फायनान्स कंपनीकडून २८ लाख रुपये गृहकर्ज घेण्यात आले. ते त्यांनी स्वत:च्या बँक खात्यात जमा करवुन घेतले. तसेच भांडारकर रोडवरील एस बँकेकडून त्या फ्लॅटवर २६ लाख २४ हजार ७९२ रुपयांचे गृहकर्ज मंजुर करुन घेतले. या कर्जाचा हप्ता आम्ही भरतो व काही महिन्यामध्ये एस बँकेचे गृहकर्जाची रक्कम परत करतो, असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांना देण्यात येणारी सदनिका स्वत:च्या नावावर करुन तिथे गणेश जाधव यांच्या सोबत भाडेकरार करुन स्वत:च्या ताब्यात ठेवली. या सदनिकेवर कर्ज प्रकरण करुन त्या गृह कर्जाचे कोणतीही परतफेड न करता सदनिकेचा ताबा स्वत: कडे ठेवून फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.
