Pune Crime News | महिला वकीलावर चालत्या कारमध्ये अत्याचार; रविवारी मध्यरात्रीची कोरेगाव पार्कमधील घटना

Pune Crime News | Woman lawyer assaulted in moving car; Incident in Koregaon Park on Sunday midnight

पुणे : Pune Crime News |  पबमधून घरी सोडण्याचा बहाणा करुन दोघा नराधमांनी एक महिला वकिलावर चालत्या कारमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंढवा-कोरेगाव पार्क रोडवर मध्यरात्री  घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील असून ती रविवारी कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये पार्टीसाठी आली होती. दोघे आरोपी नराधम हेही पार्टीमध्ये आले होते. दोघांची यापूर्वी तिची ओळख नव्हती. रात्री उशिरा पार्टी संपल्यावर त्यांनी या महिलेला घरी सोडतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून ही महिला कारमध्ये बसली. त्यानंतर त्यांनी कार काही अंतरावर नेऊन थांबविली. तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असून पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

You may have missed