Pune Crime News | अल्पवयीन असताना विवाह करुन तिला गर्भवती करणार्या पतीवर गुन्हा दाखल; पोलिसांनी पुढाकार घेऊन दिली फिर्याद
पुणे : Pune Crime News | ते मुळचे सोलापूरचे राहणारे, मुलगी अल्पवयीन असताना पळून ते पुण्यात आले. एकत्र राहु लागले. त्यातून त्यांच्यात शारीरीक संबंध आले. तिने एका मुलाला जन्म दिला. डॉक्टरांना ही मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. आता पोलिसांनी पुढाकार घेऊन फिर्याद दिली आहे. आंबेगाव पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल पांडुरंग थाटकर Vishal Pandurang Thatkar (रा. जय महालक्ष्मीनगर, जुळे सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोलापूर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीने लग्नाआधी ती शारीरिक संबंध ठेवण्यास संमती देण्याकरता असमर्थ आहे, हे माहिती होते. तरी त्याने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ऑक्टोंबर २०२४ मध्ये गर्भवती झाली. त्यानंतर ते सोलापूर ला रहायला गेले. त्यानंतर तिने जुलै २०२५ मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर डॉक्टरांना ही मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. परंतु, ही मुलगी तक्रार देण्यास तयार नव्हती. तेव्हा पोलीस स्वत: फिर्यादी झाले. हा प्रकार पुण्यात झाला असल्याने त्यांनी ही फिर्याद आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करीत आहेत.
