Pune Crime News | टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी गोड बोलून तिला टेरेसवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमावर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किरण कैलास सोनवणे Kiran Kailash Sonawane (रा. कलाशंकरनगर, बी टी कवडे रोड, घोरपडी) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत एका ४१ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी नराधमाने गोड बोलून तिला इमारतीच्या टेरेसवर नेले. तिथे तिला धमकावून खाली पाडले. तिच्याशी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवला. कुणाला काही सांगू नको, नाही तर मारेन, अशी धमकी दिली आहे. विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक देवतळे तपास करीत आहेत.
