Pune Crime News | तिसर्‍या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यु; जागामालक, कंत्राटदार, लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | नियोजित गृहप्रकल्पात तिसर्‍या मजल्यावर काम करणार्‍या बांधकाम मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यु झाला. बांधकाम कामगाराला सुरक्षा साधने न पुरविल्याने चंदननगर पोलिसांनी जागामालक, कंत्राटदार, लेबर कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शंकर डुबकवाड (वय ५१, रा. बोराटे वस्ती, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी जागा मालक रमेश वंजारी, कंत्राटदार सुभाष ज्ञानोबा साकोरे Subhash Gyanoba Sakore (रा. वडगाव शेरी), लेबल कंत्राटदार नामदेव गणगोपालवाड (रा. बोराटे वस्ती, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद डुबकवाड (वय २२, रा. बोराटे वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंत्राटदार सुभाष साकोरे यांनी रमेश वंजारी याच्या बांधकामापैकी विटांचे बांधकाम व प्लॅस्टरचे काम लेबर कंत्राटदार नामदेव गणगापोळवाड यांना दिले आहे. तेथे फिर्यादीचे वडिल शंकर डुबुकवाड हे गेल्या ३ महिन्यांपासून बिगारी कामाला जात होते. त्यांचे सोबत  कृष्णा राठोड आणि बालाजी राठोड हे काम करत होते. बालाजी राठोड हा रमेश वंजारीच्या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीसमोर प्लॅस्टरसाठी लागणारी क्रश हातगाडीत भरुन झाल्यावर ती सहाव्या मजल्यावर असणारा कृष्णा राठोड क्रेन ऑपरेट करुन वरती खेचून घेऊन तिसर्‍या मजल्यावर असणारे शंकर यांच्याकडे सोडत होता. शंकर हे क्रश असलेली हातगाडी खाली करत असताना त्यांचा तोल जाऊन ते तिसर्‍या मजल्यावरुन खाली रस्त्यावर पडले. जागामालक, कंत्राटदार, लेबर कंत्राटदार यांनी कामगारांचे सुरक्षेसाठी हेल्मेट, बुट कमरेला बांधायचा सेफ्टी बेल्ट, सुरक्षा जाळी, बांबूची परांची अशी सुरक्षा साधने तेथे पुरवलली दिसून आली नाही. याबाबत कृष्णा राठोड व बालाजी राठोड यांनी आम्ही कंत्राटदारांना वारंवार मागणी करुनही सुरक्षा साधने दिली नाहीत किंवा उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे शंकर यांच्या डोक्याला मार लागून त्यात त्यांचा मृत्यु झाल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.

You may have missed