Pune Crime News | येरवडा जेलच्या भिंतीजवळ फटाके उडवुन भाईचा बर्थडे साजरा करणारा गुन्हेगार जेरबंद
पुणे : Pune Crime News | येरवडा कारागृहात कोठडीत असलेल्या भाईचा बर्थडे साजरा करण्यासाठी येरवडा जेलच्या भिंतीजवळ फटाके उडविणार्या गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शंकर बाळासाहेब भालके Shankar Balasaheb Bhalke (वय १९, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
सुलतान सय्यद या गुन्हेगार सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा २५ जुलै रोजी वाढदिवस होता. त्याचे साथीदार शंकर भालके, केतन रवींद्र हातागळे (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) व त्याचे इतर साथीदार येरवडा भिंतीजवळ गेले. त्यांनी आकाशात उडणारे फटाके रस्त्यावर फोडून त्याचा व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ रवींद्र हातागळे याने इन्स्टाग्राम वर अपलोड केला. पोलीस अंमलदार अमित शिंदे यांच्याकडे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींची माहिती घेणे व कारागृह परिसरामध्ये निगराणी ठेवणे हे काम आहे. ते २८ जुलै रोजी सोशल मीडिया पहात असताना त्यांना सुलतान भाई हॅपी बर्थडे KING OG UPPER Yerwada Central Jail,HAPPY BDAY SULTAN BHAI,VK LOVERS असा फटाके उडवितानाचा व्हिडिओ दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्या प्रकरणी शंकर भालके याला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल वैजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार पिलाणे, मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदिप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, सोमनाथ गायकवाड, अनिल मन्हाळकर यांनी केले आहे.
