Pune Police News | मानवाधिकार आयोगाच्या रडारवर आलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली; सुदर्शन गायकवाड नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Pune Police News

पुणे : Pune Police News | खुन प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या वाहनांच्या बोनेटवर बसवून परिसरात फिरविल्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाच्या रडारवर आलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांची नियुक्त करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात १७ वर्षाच्या मुलाचा खुन झाला होता. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या मुलांना परिसरातून वाहनांच्या बोनटवर बसवुन परिसरातून फिरवण्यात आले होते. त्यांना गुडघ्यावर बसवुन मारहाण करण्यात आली होती. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आयोगाच्या कमिटीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भेट देऊन बुधवारी माहिती घेतली होती. त्यानंतर रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन रामभाऊ कुदळे यांची खडक पोलीस ठाण्यातून मांजरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता बाळासो लाड आणि प्रसन्न त्रिंबक जर्‍हाड यांची खडक पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक सत्यवान शंकर गेंड यांची गुन्हे शाखेतून विश्रामबाग पोलीस ठाण्यात तर पोलीस उपनिरीक्षक मधुकर ज्ञानदेव तुपसौदर यांची गुन्हे शाखेतून समर्थ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

मुंबई शहर पोलीस दलातून बदली होऊन आलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश विठ्ठल निकम यांची मांजरी पोलीस ठाणे तसेच गोरख सुखदेव सातपुते यांची खराडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

You may have missed