Pune Crime News | नदी पात्रात फिरणार्या सराईत गुन्हेगाराकडून डेक्कन पोलिसांनी गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | गावठी पिस्तुल बाळगून नदीपात्रात फिरणार्या सराईत गुन्हेगाराला डेक्कन पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ Shrikant alias Sonya Santosh Maral (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मरळ याच्याविरुद्ध या पूर्वी डेक्कन, वाकड, देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणीसह गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, हवालदार सचिन गायकवाड, सागर घाडगे हे डेक्कन परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना माहिती मिळाली की, नदीपात्रात गुंड मरळ थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मरळ याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सपना देवताळे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुले, धनश्री सुपेकर यांनी केली.
