Pune Crime News | मुलगी व्यवस्थित रहात नसल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात डोक्यात दगड घालून वडिलांचा खुन; जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तरुणाने येऊन दिली माहिती

Pune Crime News

पुणे : तुमची मुलगी आमच्याकडे व्यवस्थित रहात नाही, या कारणावरुन झालेल्या भांडणात एकाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन केला. काळेपडळ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

सैफन बाबुलाल सय्यद (वय ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. हनुमंत ऊर्फ सागर सुग्रीव कांबळे Hanumant alias Sagar Sugriv Kamble (वय २५, रा. आशिर्वाद पार्क, महंमदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विजया जयदीप चव्हाण (वय ३७) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना महमंदवाडी येथील लक्ष्मी पार्क जवळील फॉरेस्टच्या डोंगरात सिमेंटच्या  टाकीजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्यात रात्री साडेअकरा वाजता एक जण मोठ्याने ओरडत आला. त्याच्या गळ्याजवळ जखम झाली होती. त्याचे कपड्यावर रक्त सांडलेले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारल्यावर हनुमंत ऊर्फ सागर कांबळे याने सांगितले की, मी सैफन सय्यद यास लक्ष्मी पार्क येथे मारुन टाकले आहे. त्याची मुलगी सना ही आमच्याकडे व्यवस्थित राहत नाही. म्हणून त्यास मी त्याच्या  डोक्यात दगड टाकून मारुन टाकले आहे.

सैफन सय्यद याची मुलगी सना ही हनुमत कांबळे याची बहिण विद्या हिचा मुलगा लखन चंद्रकांत काळोखे (रा. लक्ष्मी पार्क, महंमदवाडी) याची बायको आहे. त्यांचे आंतर धर्मीय लग्न झाले होते. सना ही व्यवस्थित वागत नसल्याच्या कारणावरुन सागर कांबळे यांनी सय्यद यांचा खुन केल्याचे दिसून आले. काळेपडळ पोलिसांनी हनुमंत कांबळे याला अटक केली आहे.

You may have missed