Pune Crime News | सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करुन सायबर चोरट्यांनी कंपनीला घातला 45 लाखांचा गंडा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कंपनीचे मालक अमेरिकेला गेले असताना त्यांच्या नावाने मायक्रोसॉफ्ट  टिम्स या प्लॅटफॉर्मवर सायबर चोरट्यांनी “वर्क  ग्रुप चॅट”  Work Group Chat असा ग्रुप तयार करुन त्यावर सुचना देऊन कंपनीला ४५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ३० वर्षाच्या आयटी पर्सन महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फा आयसीटी ही सॉफ्टवेअरची कंपनी आहे. या कंपनीमध्ये अनेक सॉफ्टवेअर, फर्मवेअर, हार्डवेअर, मॅकेनिकल डिझाईनची कामे केली जातात. कंपनी काही प्रॉडक्ट बाहेरच्या देशात सर्व्हिस देण्याचे काम करते.

सायबर चोरट्याने ६ ऑगस्ट रोजी सकाळी कंपनीचे मायक्रोसॉफ्ट टिम्स या प्लॅटफॉर्मवर कंपनीचे मुळ मालकांच्या नावाने एक फेक ‘वर्क ग्रुप चॅट’ असा एक ग्रुप तयार केला. त्याने कंपनीचे मुळ मालक, दुसरे मालक व कंपनीचे अकाऊंटंट यांना त्यात घेतले. त्यानंतर मुळ मालकांच्या नावाने या ग्रुपवर please Verify the Current Available balance in all company bank accounts. Once confirm, please send a screenshot of the balance details to the group chat  कंपनीतील सर्व बँक खात्यातील बॅलन्सचे स्क्रीनशॉट टाकण्याबाबत मेसेज टाकला. मुळ मालक अमेरिकेत असल्याचे कंपनीचे व्यवहाराबाबत त्यांनी मायक्रोसॉफ्ट टिम्स या अकाऊंटवर ग्रुप तयार करुन मेसेज टाकला असावा, असे अकाऊंटंट यांना वाटले. त्यांनी सर्व बँक खात्याचे स्क्रीन शॉट टाकले. त्यानंतर त्यांनी ४५ लाख रुपयांचा चेक तयार करुन ठेवा.

मी तुम्हाला अकाऊंट डिटेल देईल, त्यानंतर तो चेक बँकेत जाऊन जमा करा, असे सांगितले. त्याप्रमाणे अकाऊंटंट यांनी दुसर्‍या मालकाची सही घेऊन ४५ लाख रुपयांचा चेक तयार केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयसीआयसीआय बँकेत जाऊन तो ग्रुपवर दिलेल्या खात्यात डिपॉझिट केला. त्याची पावतीचा फोटो त्यांनी ग्रुपवर टाकला. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजता या ग्रुपवर त्याने मालकाच्या वतीने मेसेज टाकला की, सदर चेक कॅन्सल करा. मी तुम्हाला दुसऱ्या  बँक अकाऊंटची माहिती पाठवत आहे. त्यावर तुम्ही चेक भरा, असे सांगितले. त्यानंतरअकाऊंटंने आर बी एल बँकेमध्ये पहिला चेक कॅन्सल करण्याची Approval Request अ‍ॅप्रुव्हल रिक्वेस्ट टाकली.

पण मुळ मालक हे अमेरिकेत असल्याने ती अप्रुव्हल त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे तो चेक क्लिअर होऊन त्याद्वारे पैशांचे ट्रान्झेक्शन झाले. कंपनीच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्यानंतर कंपनीचे मुळ मालक यांचा रात्री पावणेदहा वाजता व्हॉटसअ‍ॅपवर अकाऊंटंट यांना मेसेज आला की, आपल्या कंपनीच्या अकाऊंटंमधून ४५ लाख रुपये डेबीट झाले आहे, याची माहिती मला द्या. अकाऊंटंटने माहिती दिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, सायबर चोरट्याने कंपनीच्या मालकाच्या नावाने फेक ग्रुप तयार करुन कंपनीची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.

You may have missed