Pune Crime News | स्वस्त सहलीचे आमिष दाखवून एक लाख तीन हजार रुपयांची फसवणूक; पर्यटन कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | स्वस्तात सहलीचे आयोजन करून देण्याचे आमिष दाखवत एका पर्यटन कंपनीच्या संचालकाने ग्राहकाची एक लाख तीन हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालक रेखा वैष्णव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावर निमा हॉलिडेज या पर्यटन कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या संचालकाने तक्रारदाराला कमी खर्चात सहल आयोजित करून देण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने एक लाख तीन हजार रुपये जमा केले. मात्र, ठरल्याप्रमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You may have missed