Pune Crime News | स्कॉर्पिओसाठी बनावट कागदपत्रे तयार करुन पतसंस्थेतून कर्ज घेऊन 10 लाख 50 हजारांची केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार खरेदी करण्यासाठी सह्याद्री मोटर्स येथून खरेदीसाठी कर्ज मागणी करुन बनावट कागदपत्राद्वारे १० लाख ५० हजार रुपयांचे वाहन कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विजय भगवान शिर्के (वय ४५, रा. पार्थ दर्शन सोसायटी, आंबेगाव) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नील हनुमंत लिपाणे Swapnil Hanumant Lipane (रा. टेल्को सोसायटी, जांभुळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धन्वंतरी पतसंस्थेच्या धनकवडी शाखेमध्ये १ जानेवारी २०१९ ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील लिपाणे याने धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेत महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ सह्याद्री मोटर्स येथून खरेदीसाठी कर्ज मागणी अर्ज सादर केला. या अर्जासोबत पतसंस्थेला फसवण्याच्या उद्देशाने सह्याद्री मोटर्सचे इनव्हाईस, इन्श्युरन्स पॉलिसी इत्यादी बनावट कागदपत्रे तयार केली. पतसंस्थेची दिशाभूल करुन त्या आधारे १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. आयसीआयसीआय बँकेच्या फातिमानगर येथील शाखेत सह्याद्री मोटर्स याच्या नावे बनावट खाते काढून त्या खात्यात १० लाख ५० हजार रुपयांचा धनादेश भरला. १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज व त्यावरील व्याज न भरता संस्थेची दिशाभूल करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.
