Pune Crime News | महाविद्यालयीन युवतीचा भर रस्त्यात टोळभैरवाने घेतला किस; फरासखाना पोलिसांनी पोक्सोखाली गुन्हा दाखल करुन टोळभैरवाला केली अटक
पुणे : Pune Crime News | महाविद्यालयातून पायी घरी जात असलेल्या युवतीचा टोळभैरवाने भर रस्त्यात हात पकडून तिच्या गालाची पप्पी घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी या टोळभैरवावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
संकेत संतोष शेडगे Sanket Santosh Shedge (वय २७, रा. बार्शी नाका, कुरुडवाडी, सोलापूर) असे या टोळभैरवाचे नाव आहे. ही घटना १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. ही युवती कॉलेजवरुन पायी घरी जात असताना तिच्या गावाकडील टोळभैरव तिचा पाठलाग करत आला. त्याने पाठीमागून युवतीचा हात धरला. तिच्या हातामध्ये एक मोबाईल फोन दिला. त्याच्यावरुन मला फोन करायचा व माझ्याशी बोलायचे नाही तर तुझ्याकडे बघुन घेईन, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे ही युवती घाबरुन गेली होती. या टोळभैरवाने तिच्या डाव्या गालाची पप्पी घेऊन तिचा विनयभंग केला. हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता. त्यानंतर त्याने पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सकेत शेंडगे याला पकडून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील तपास करीत आहेत.
