Pune Crime News | लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून सोनसाखळी चोरी

Crime

पुणे : Pune Crime News | लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ४२ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ठाण्यातील कळवा परिसरात राहतात. त्या मंगळवारी (२५ ऑगस्ट) खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता परिसरात आल्या होत्या.

दुपारी चारच्या सुमारास त्या लक्ष्मी रस्ता परिसरातून जात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पिशवीतील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली.

सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार नाकाडे पुढील तपास करत आहेत.

You may have missed