Pune Crime News | फ्लॅट विकण्यास नकार दिल्याने पतीने ठोसा मारुन पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर; कोथरुडमधील घटनेत पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पती पत्नी या दोघांच्या नावावर असलेला वारजे येथील फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिला. त्याचा राग येऊन पतीने जोरात ठोसा मारल्याने पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद बसवराज हंदीगुंद (वय ४७, रा. बंगला नंबर ११, सर्वत्र सोसायटी, पौड रोड, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती पत्नी आहे. त्या दोघांच्या नावावर वारजे येथील सारर्थ सिन्क्लेअर येथे फ्लॅट आहे. वारजे येथील फ्लॅट विकण्याबाबत चर्चा चालु होती. फिर्यादी यांनी हा फ्लॅट विकण्याबाबत नकार दिला. या फ्लॅट विकण्याबाबत कोणतीही सही करणार नाही, असे बोलल्या. तेव्हा प्रमोद हंदीगुंद यांनी पत्नीला मोठ मोठ्याने वाईट शिवीगाळ केली. त्यांच्या नाकावर उजव्या हाताच्या पंज्याच्या मुठीने जोरात बुक्की मारली. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. प्रमोद हंदीगुंद याने मारलेल्या बुक्कीमुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या आहेत. पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.
