Pune Crime News | पुणे : तुळशीबाग लॉज प्रकरणात महिलेचे चित्रीकरण करणारा आरोपी एकटाच, ‘स्टिंग ऑपरेशन’चा बहाणा – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

CP Amitesh Kumar

Pune Crime News | पुण्यातील तुळशीबाग परिसरातील एका लॉजमध्ये महिलेचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’चा दावा करणारा आरोपी प्रत्यक्षात एकटाच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच या कारवाईत कोणताही राजकीय दबाव नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DXJ3O2JCWf7

ही घटना ८ एप्रिलच्या मध्यरात्री तुळशीबाग येथील एका लॉजमध्ये घडली होती. रोहन राजेंद्र कदम (वय २८) याने खिडकीतून दुसऱ्या खोलीतील महिलेचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर लॉजमालकाने आरोपीला पकडले. त्या वेळी त्याने ‘स्टिंग ऑपरेशन’ करत असल्याचा दावा करत काही पत्रकार सोबत असल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासणीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर आरोपी घटनास्थळी एकटाच असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

You may have missed