Pune Crime News | ‘तू बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करुन तुला मारुन टाकेन’ ! लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन केले जखमी, 5 लाखांची सोन्याची चैन हिसकावुन नेणार्‍या पाच जणांना अटक

Pune Crime News | 'If you meet me outside, I will shoot you and kill you'! A gang brutally beat up a young man and injured him during a wedding mehndi ceremony, five people arrested for snatching a gold chain worth Rs 5 lakh

पुणे : Pune Crime News | लग्नाच्या मेंहदीच्या कार्यक्रमात नाचत असताना टोळक्याने दोघा तरुणांना बेदम मारहाण केली. तु मला बाहेर भेट तुझ्यावर फायरिंग करुन तुला मारुन टाकीन, अशी धमकी देऊन कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील ५ लाख रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत नंदु अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष काची (वय ४५), यश काची (वय २०, दोघे रा. ममतानगर, सांगवी), दत्ता रघुनाथ चव्हाण Datta Raghunath Chavan (वय ३७, रा. वारजे), सुशिल सूर्यकांत सर्वगौड Sushil Suryakant Sarvagowda (वय ४३, रा. पाटील इस्टेट, संगमवाडी) आणि यश दीपक सावंत Yash Deepak Sawant (वय २३, रा. जुनी सांगवी) यांना अटक केली आहे. ही घटना संगमवाडी येथे २७ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली. न्यायालयाने त्यांना १ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदु काची यांचा पान शॉप आहे. त्यांच्या मंगळवार पेठेतील नातेवाईकांच्या घरी लग्न आहे. तेथील जागा अपुरी असल्याने त्यांनी संगमवाडी येथील  सुनिता रामचंद्र काची यांच्या ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम ठेवला होता. फिर्यादी व त्यांचे मित्र गोपीनाथ चौर्य हे मेहंदी कार्यक्रमाला आले होते. साऊंड सिस्टिमवर सर्व डान्स करीत होते. संतोष काची हा त्याच्या कारमधून तेथे आला. त्याने थोडा वेळ डान्स केला. त्यानंतर काही कारण नसताना नंदू काची यांना शिवीगाळ केली. त्यांच्या शर्ट पकडून धक्काबुक्की केली. “तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करुन तुला जीवे ठार मारुन टाकेन,” अशी धमकी दिली. त्यानंतर संतोष काची याने त्याचा मुलगा यश काची, दत्ता चव्हाण, सुशील सर्वगौड, यश सावंत यांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी नंदु काची व गोपीनाथ चार्य या दोघांना हाताने मारहाण केली. संतोष काची याने कोयता काढून हवेत फिरवला. कोयता पाहुन लोक घाबरून बाजुला झाले. त्यावेळी त्याने कोयता दाखवून गळ्यातील ५ लाखांची ५ तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करीत आहेत.

You may have missed