Pune Crime News | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवित असलेल्या मॅनेजरला अटक करुन कोंढवा पोलिसांनी 3 पिडित महिलांची केली सुटका

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कोंढवा येथील लोणकर रोडवरील रिफ्रेश  स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरुन कोंढवा पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत खात्री करुन छापा घातला. तेथील ३ महिलांची सुटका करुन मुळचा नागालँडच्या मॅनेजरला अटक केली आहे.

मोनको लोएम (वय ३६, रा. तळेकर कॉलनी, पिंगळे वस्ती, मुंढवा) असे या मॅनेजरचे नाव आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल हिरवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत १० ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की, लोणकर रोडवरील रिफ्रेश स्पा सेंटर येथे महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी रिफ्रेश स्पा सेंटर येथे बनावट ग्राहक पाठविला. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी रिफ्रेश स्पा सेंटरवर छापा टाकला. स्पा सेंटरची झडती घेतली असता तेथे ३ महिला आढळून आल्या. मॅनेजर मोनको लोएम याने पैशांचे आमिष दाखवून आमच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याचे या महिलांनी सांगितले. पोलिसांनी मॅनेजरवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सहायक फौजदार शरद वाकसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल रासगे, स्वागत पळसे, अमित सूर्यवंशी, पुजा नागरगोजे, स्वाती शिंदे यांनी केली आहे.

You may have missed