Pune Crime News | सासरी होणार्‍या छळामुळे विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय; उंड्री येथील घटनेत काळेपडळ पोलिसांनी पतीला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सासरी होणार्‍या कौटुंबिक छळामुळे विवाहितेने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

नबिला शहबाज खान (वय २२, रा. गगन त्रिशा सोसायटी, उंड्री) विवाहितेचे नाव आहे. काळेपडळ पोलिसांनी तिचा पती शहबाज जफर खान Shahbaz Zafar Khan (वय २५, रा. गगन त्रिशा सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे. तसेच सासु परविन जफर खान (वय ५०), सासरे जफर खान (वय ५८) आणि नणंद तब्बसुम सय्यद (वय ३२, सर्व रा. कैसर कॉलनी, बाईजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गगन त्रिशा सोसायटीत १३ एप्रिल रोजी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत नबिला यांच्या भावाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबिला हिचा शहबाज खान याच्याबरोबर विवाह झाला होता. पतीसह सासु, सासरे, नणंद घरगुती कारणावरुन तिला शारीरीक व मानसिक छळ करत होते. वेळोवेळी त्यांच्या व्यवसायाकरीता तसेच दैनंदिन वापराकरीता पैशांची मागणी करत होते. पैसे न दिल्याच्या कारणावरुन तिला वाईट वाईट शिवीगाळ करुन मारहाण करत. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत असत. या छळाला कंटाळून नबिला हिने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आपले जीवन संपविले. पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील तपास करीत आहेत.

You may have missed