Pune Crime News |  मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या कारणावरुन मामाच्या नवीन बांधकामावरुन भांडणे करुन तरुणाच्या डोक्यात दगड मारुन केले गंभीर जखमी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  मित्राची प्रगती पाहवत नसल्याने मामाच्या नवीन बांधकामावरुन भांडणे करुन तरुणाच्या डोक्यात दगड  मारुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अभिजित बाळु गायकवाड (वय २१, रा. माळवाडी, मांजरी) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बादल विकास नरसिंगे Badal Vikas Narsinge (वय २०, रा. माळवाडी, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित गायकवाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अभिजित गायकवाड हे इलेक्ट्रिशन आहेत. त्यांचा मामा सुनिल लोंढे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. ते २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा मित्र बादल नरसिंगे हाही त्यांच्यासोबत गप्पा मारु लागला. फिर्यादीचे मामा यांच्या नवीन घराचे बांधकामाबाबबत बादल  नरसिंगे याच्या मनात त्यांच्याविषयी राग होता. त्यांची प्रगती त्याला पाहवत नसल्याने तो नवीन घराचे बांधकामावरुन वारंवार त्यांच्यासोबत भांडण करीत असे. या जुन्या वादातून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ का करतो, असे विचारले असता त्याने जवळच पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात घातला. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. फिर्यादी व मित्रांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आजी नंदबाई लोंढे तेथे आल्या. त्यांनी अभिजित यांना जवळच्या वरद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तराटे तपास करीत आहेत.