Pune Crime News | पोलीस ठाण्याच्या आवारात वकिलाला मारहाण करणारा पोलीस अंमलदार निलंबित

Pune Crime News | Police officer suspended for assaulting a lawyer in the police station premises

पुणे : Pune Crime News | ट्रिपल सीट जाणार्‍या वकिलाला हटकल्याने त्याने पोलीस अंमलदाराला वर्दी उतरवतो, असे म्हणाल्यावर त्याला पोलीस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ करुन २२ कानाखाली मारुन डोक्यामागे मारहाण केल्याने पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे.

नितीन सोमनाथ पोंधे (Nitin Somnath Pondhe) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. नितीन पोंधे हे लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पेरणे मार्शल म्हणून नितीन पोंधे हे नेमणुकीला होते. ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजता म्हसोबा मंदिराजवळ, कंटेनर बंद पडला होता. तो ढकलून वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य करीत होते. त्यावेळी अ‍ॅड. साहिल दिलावर शेख (वय २६, रा. कोरेगाव भीमा) हे मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट जात होते. पोंधे यांनी त्यांना हटकले. त्याचा राग येऊन साहिल शेख यांनी ते वकील असल्याचे सांगून तुमची वर्दी उतरवतो, असे म्हणाले. त्यावर पोंधे यांनी अ‍ॅड. साहिल शेख याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेमध्ये अ‍ॅड. साहिल शेख यांनी पोलीस अंमलदार पोंधे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोंधे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. मोबाईल ओढुन एकूण २२ कानाखाली, डोक्यामागे मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यात साहिल शेख यांना पोलीस ठाण्याच्या आवारात पोंधे हे हाताने मारहाण करीत असल्याचे दिसून आल्याने साहिल शेख यांच्या तक्रारीवरुन पोंधे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार नितीन पोंधे यांचे वर्तन पोलीस दलाचे शिस्तीचे उल्लंघन करणारे, अशोभनीय असे बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असे वर्तन केले आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी त्यांना निलंबित केले आहे.

You may have missed