Pune Crime News | अंमली पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी ‘पोर्टर’अ‍ॅपचा वापर, अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या तिघाच्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 47 ग्रॅम एमडीसह 21 लाखांचा माल केला हस्तगत

Pune Crime News | 'Porter' app used for drug delivery, rural police bust three drug smugglers; 47 grams of MD and goods worth Rs 21 lakh seized

पुणे : Pune Crime News |  अंमली पदार्थ खरेदी केल्यानंतर त्याचा पुरवठा करणार्‍या आरोपींनी पोर्टर डिलिव्हरी अ‍ॅपचार वापर करुन अंमली पदार्थ पुरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४६ ग्रॅम एम डीसह २१ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

विशाल मारुती मोरे Vishal Maruti More (वय २०, रा. बाफना मळा, शिरुर), प्रतिक संतोष लंघे Symbol Santosh Langhe (वय २५, रा. करडे, ता. शिरुर), मिथुन विजयपाल सिंग Mithun Vijaypal Singh (वय २६, रा़ रामलिंग रोड, सावतामाळी नगर, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर परिसरात १७ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, न्हावरा फाटा ते बाबुराव नगरकडे जाणार्‍या रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालयाचे समोर एक कार उभी असून त्यांच्याकडे एम डी हा अंमली पदार्थ आहे. या बातमीची खातरजमा करुन स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस यांनी कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४७ ग्रॅम एम डी, दोन कार असा २१ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला.

त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी अंमली पदार्थांची खरेदी केल्यानंतर पुरवठा करणार्‍या आरोपींनी पोर्टर या डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर करुन अंमली पदार्थ पुरविला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोर्टरद्वारे अंमली पदार्थांची डिलीव्हरी घेणार्‍या व्यक्तीकडे तपास पथकाकडून चौकशी सुरु केली आहे. त्या व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आह. उपलब्ध होणार्‍या पुराव्याच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. पोर्टर अ‍ॅपद्वारे पुरवठा करणार्‍या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

युवकांमध्ये ड्रग्सचा वाढता वापर रोखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरु राहणार असून समाजाला अंमली पदार्थाचे विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी नशामुक्त भारत अभियानांतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली आहे.

You may have missed