Pune Crime News | लॉजमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाकडून 4 तरुणींची सुटका करुन एजंटाला केली अटक
पुणे : Pune Crime News | पुणे सातारा रोडवरील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरुन अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून ४ तरुणींची सुटका केली़ एका एजंटाला अटक केली आहे.
सचिन बाबुराव गायकवाड Sachin Baburao Gaikwad (वय २८, रा. पानसरे नगर, कोंढवा, मुळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. लातूर) असे अटक केलेल्या एजंटाचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, पुणे सातारा रोडवरील आंबेगाव येथील द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे. यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी बातमीची पडताळणी करण्यासाठी ११ मे रोजी बनावट ग्राहक पाठविले. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी द्वारका लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग येथे छापा टाकला. लॉजमध्ये आणलेल्या ४ पिडित तरुणींची सुटका केली. सचिन गायकवाड या एजंटावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशात चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, केदार, कोंडे महिला पोलीस अंमलदार खेडकर, इंगळे यांनी केली आहे.
