Pune Crime News | पुणे : 70 वर्षाच्या वडिलांचा 40 वर्षाच्या मुलीने छातीत चाकू मारुन केला खुन

Pune Crime News | Pune: 70-year-old father stabbed to death by 40-year-old daughter

पुणे : Pune Crime News | दारू पिऊन त्रास देत असल्याच्या रागातून ४० वर्षाच्या मुलीने आपल्या ७० वर्षाच्या वडिलांच्या छातीत चाकूने वार करुन त्यांचा खुन केल्याची घटना समोर आली आहे.

जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री ११ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. त्यांनी दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. त्यातून त्याच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

You may have missed