Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणावर सपासप वार; सिंहगड रस्त्यावर निर्घृण हत्या, आरोपी फरार

Pune Crime News | Youth attacked on suspicion of having an immoral relationship; Brutal murder on Sinhagad road, accused absconding

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ४१ वर्षीय व्यक्तीची धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मृत व्यक्तीचे नाव रुपेश सुरेश भादिर्गे (वय ४१, रा. नऱ्हे, पुणे) असे असून याप्रकरणी युवराज गेजगे Yuvraj Gejge (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वडगाव बुद्रुक येथील विकास दांगट यांच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपी युवराज गेजगे याच्या पत्नीचे आणि रुपेश भादिर्गे यांचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीच्या मनात संताप होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हिंसेत झाले.

रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने रुपेश यांच्यावर मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या रुपेश यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed