Pune Crime News | पुणे : गणेश पेठेतील वडापावच्या गाड्यावरील भांडण बेतलं जीवावर; छातीत बुक्क्या मारल्याने तरुणाचा मृत्यु, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन युवकाला केली अटक

Pune Crime News | Pune: A fight over a vada pav cart in Ganesh Peth turned deadly; a young man died after being punched in the chest, and the police have registered a murder case and arrested the youth.

पुणे : Pune Crime News |  हातगाडीवर मिसळ खाण्यासाठी गेले असताना चुकून पायावर पाय पडल्याने दोघांमध्ये झालेल्या वादात छातीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन एका तरुणाचा मृत्यु झाला. फरासखाना पोलिसांनी मारहाण करणार्‍या तरुणाला अटक केली आहे.

शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव किशोर साळुंखे Vaibhav Kishor Salunkhe (वय २४, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात येथील हरिओम ज्युस सेंटरसमोर ९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव साळुंखे व शिवम परदेशी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. शिवम परदेशी हा रिक्षाचालक असून वैभव साळुंखे हा नोकरी करतो. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डुल्या मारुती चौकातील वडापाव सेंटरवर शिवम हा मिसळ खात होता. त्यावेळी गर्दी झाल्याने तेव्हा चुकून पाय लागल्याने शिवम व वैभव यांच्यात वादावादी झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. वैभव याने शिवम याच्या छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेथील लोकांनी दोघांची भांडणे सोडविली. त्यानंतर शिवम हा घरी गेला. त्यावेळी आईने त्याला चहा बनवुन देऊ का, असे विचारले. त्यावर तो बोलला की माझ्या छातीत व पोटात खुप दुखत असून मी थोडा वेळ आराम करतो़, असे सांगून तो घरामध्ये जाऊन झोपला.

सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याच्या आईने इतरांच्या मदतीने त्याला के ई एम हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपाचारापूर्वी डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले. शिवम याचे शवविच्छेदन केले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने शिवम याचा मृत्यु झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. फरासखाना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. वैभव व शिवम यांच्यातील हाणामारी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन वैभव साळुंखे याला अटक केली आहे.

You may have missed