Pune Crime News | दुकानदाराशी झालेल्या वादातून दारुच्या नशेत तरुणाने दगडफेक करून गाड्यांच्या फोडल्या काचा, सिंहगड रोडवरील सुयोग श्री सोसायटीमधील घटना
पुणे : Pune Crime News | ज्या दुकानदाराने आश्रय दिला. त्याच्याबरोबर वाद झाल्याने दारुच्या नशेत एका तरुणाने मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडल्या. या घटनेत ४ कारचे नुकसान झाले आहे. ही घटना सिंहगड रोडवरील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, एका तरुणाला येथील गॉगल विक्री करणार्या दुकानदाराने आश्रय दिला आहे. २० वर्षाच्या या तरुणाचा दुकानदाराबरोबर वाद झाला. त्यानंतर त्याने दारुच्या नशेत मध्यरात्री ४ गाड्यांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडल्या आहेत. या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
