Pune Crime News | पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोहगाव, विमाननगर, वाघोली, चंदननगर, लोणीकंद, भा. विद्यापीठ आणि वानवडी परिसरातील 27 गुन्हेगार तडीपार

Pune Crime News | Pune: Against the backdrop of Ganeshotsav, 27 criminals have been busted in Lohagaon, Vimanagar, Wagholi, Chandanagar, Loni Kand, Bharati Vidyapeeth, and Wanwadi areas.

पुणे : Pune Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दतील सराईत २७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यात परिमंडळ ७ मधील २२ गुन्हेगारांचा समावेश आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ३ आणि वानवडी पोलीस ठाण्यातील २ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

लोहगाव पोलीस ठाणे :

गुलाम ऊर्फ गुड्डु नवरुलहक मुस्ताफा खान (वय ५०, रा. बुद्ध विहार कलवड वस्ती, लोहगाव), शुभम सुखदेव सोनवणे (वय ३८,  रा. बंगला नं. १०१, संजय पार्क, एअर फोर्स रोड, लोहगाव), दिपक तुकाराम गायकवाड (वय ४६ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०१, साई अंगण सोसायटी, लोहगाव), अतुल गौतम ढोकरे (वय ३५ वर्षे, रा. लेन नं. ६, गणराज चौक, कलवड वस्ती, लोहगाव), आरती संजय साठे ऊर्फ जमदाडे (वय ४३ वर्षे, रा. पार्कश्री फ्लॅट नं. ६०३, पोरवाल रोड, धानोरी, लोहगाव)

विमानतळ पोलीस ठाणे :

अनिल साहेबराव वीर (वय ४७ वर्षे, रा. खेसे विद्यालयाजवळ, इंदिरानगर, धानोरी), मुकेश बजरंग बुरुंगे(वय ३६ वर्षे, रा. लेन नं. १०, यमुना नगर, विमाननगर), सागर गौतम अवधूत (वय २२ वर्षे, रा. स. मा. आंबेडकर शाळा पाठीमागे, रामवाडी)

वाघोली पोलीस ठाणे :

रिना पवन राजपुत(वय ३५ वर्षे, रा. बोरकरवस्ती, भावडी रोड, वाघोली, ता. हवेली), दत्तात्रय रंगनाथ गायकवाड(वय २९ वर्षे, रा. लेन नं. ११, दुबे नगर, केसनंद रोड, वाघोली),  महेश देवराम लोंढे (वय २६ वर्षे, रा. दुबे नगर, लेन नं. १३, वाघोली),

लोणीकंद पोलीस ठाणे :

सागर राजू ऊर्फ राजेंद्र भालसिंग(वय ३२ वर्षे, रा. भालसिंग वस्ती, कोलवडी, ता. हवेली), सचिन किसन शिंदे (वय ३९ वर्षे, रा. गणेश मंदिराजवळ, लोणीकंद, ता. हवेली), हर्षद कुमार शिंदे(वय २४ वर्षे, रा. शिंदे वस्ती, लोणीकंद, ता. हवेली), रोशन कुमार साहू(वय २४ वर्षे, रा. सध्या बोरकरवस्ती, विटकर यांच्या खोलीत, भाड्याने भावडी, ता. हवेली), अजिंक्य दादासाहेब मस्कुटे(वय २७ वर्षे, रा. खामगाव बु., ता. दौंड), संतोष गोविंद जाधव(वय २८ वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली), प्रकाश बाबुराव शिवभक्ते (वय ३४ वर्षे, रा. खडकवाडी, लोणीकंद),

चंदननगर पोलीस ठाणे :

सुमित सुशील बोरगे(वय ३० वर्षे, रा. स. नं. ५६/२, पंचशील नगर, माळवाडी, वडगावशेरी),  चंदननगर गणेश जालिंदर गलांडे(वय ३७ वर्षे, रा. ओमकार सोसायटी, आनंद पार्क, सर्वे नं. ४९, वडगावशेरी), अतिश उमेश डिगरे(वय २३ वर्षे, रा. लेन नं. ९, कमल पार्क सोसायटी, धानोरी), सुमित ऊर्फ बंटी रणजित गायकवाड(वय २५ वर्षे, रा. स. नं. ३०/२, रामवाडी)

या आरोपींवर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर करून जिवे ठार मारणे, गुन्ह्याचा कट रचणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, व्हिडीओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे, जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत पसरवून तोडफोड करणे, गंभीर दुखापत करणे, जुगार चालविणे/खेळणे, मानवी अपव्यापार करणे, अल्पवयीन बालकाचा विनयभंग करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे, अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती/विक्री करणे इ. प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी त्यांना तडीपार केले आहे़

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. गणेशनगर, आंबेगाव पठार), सरफरोज समीर शेख ऊर्फ डर (वय २४, रा. एस आर ए कॉलनी, लेक टाऊन सोसायटीजवळ, कात्रज) आणि महेश/ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज) या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

शरीराविरुद्ध, मालमत्तेचे गंभीर गुन्हे करणारा गुन्हेगार मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) तसेच अवैध दारुचा व्यवसाय करणारा अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर) अशी  तडीपार करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. शेख याच्याविरुद्ध मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. राऊत याच्याविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर  यांनी दोघांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

You may have missed