Pune Festival 2026 | “पुणे फेस्टिव्हल”तर्फे शनिवारी ढोल-ताशांच्या गजरामध्ये रंगणार ‘मंगलाचरण सोहळा’

Pune Festival 2026 | 'Manglacharan Ceremony' to be celebrated on Saturday with the beats of drums and percussion by 'Pune Festival'

पुणे : Pune Festival 2026 |  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या यंदाच्या पुणे फेस्टिव्हलतर्फे शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता अलका चौकात आगळावेगळा असा ‘मंगलाचरण सोहळा’ रंगणार आहे. यामध्ये, शिवमुद्रा ढोल पथकाचे स्थिर वादन होणार असून पुणे फेस्टिव्हलचे बोधचिन्ह असलेली भव्य रांगोळी रेखाटण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हल २०२६ चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ईश्वराकडे कल्याण आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते, त्याला मंगलाचरण म्हणतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल तर्फे हा आगळावेगळा ‘मंगलाचरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

या वेळी पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई, खासदार मेधा कुलकर्णी,  महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळ व अखिल मंडई गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच पारंपारिक वेशभूषेतील कलाकार, पुणे शहराच्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठीत मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पुणेकर गणेशभक्त उपस्थित राहणार आहेत, असेही कृष्णकुमार गोयल यांनी यावेळी सांगितले.

You may have missed