Pune Crime News | पुणे : बिअर शॉपीत गुंतवणुक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या टुरिस्ट व्यवसायिक कपिल भालेराववर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | धनकवडी परिसरातील बिअर शॉपी चालवायला घेऊन त्यात गुंतवणूक केल्यास भागीदारी देतो, असे सांगून ५ लाख रुपये घेऊन फसवणूक करणार्या टुरिस्ट व्यावसायिकावर काळे पडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संकेत शशिकांत शिवशरण (वय २९, रा. ग़णेश कॉलनी, काळेपडळ) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कपिल दिलीप भालेराव Kapil Dilip Bhalerao (वय २८, रा. ज्योती विहार सोसायटी, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काळेपडळ येथे ४ ऑगस्ट २०२३ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत शिवशरण यांचा मसाल्यांचा व्यापार आहे. तर आरोपी कपिल भालेराव यांचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. दोघांची ओळख होती. भालेराव याने संकेत शिवशरण यांना धनकवडी परिसरात एक बिअर शॉपील चालवायला घेऊन त्यात तु गुंतवणुक केल्यास २७.०२ टक्के नफा देतो, असे सांगून त्याप्रमाणे भागीदारी करार केला. त्यानंतर त्यांच्याकडून वडिलांच्या कॅनरा बँकेच्या खात्यावर चेकद्वारे ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर यश बीअर शॉपी चालू केली नाही. लोहगाव -पोरवाल रोड येथील ठेका बिअर शॉप मध्ये पैसे गुंतवणूक केली. त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा न देता, त्यांचा विश्वासघात करुन त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिर तपास करीत आहेत.
