Pune Crime News | पुणे : पौड येथील गाव ओढ्यात अतिक्रमण करुन भिंत बांधुन देण्यास विरोध केल्याने शेतकर्‍याचा पाठलाग करुन दिली जीवे मारण्याची धमकी; राजेंद्र बाळू रसाळ याला अटक

Pune Crime News | Pune: Farmer chased and threatened to kill for opposing construction of wall in village stream in Paud; Rajendra Balu Rasal arrested

पुणे : Pune Crime News | पौड येथील गाव ओढ्यात अतिक्रमण करुन भिंत बांधण्यास विरोध केल्याने प्लॉटिंग करणार्‍याने ३ महिला व पुरुषांना शेतकर्‍याच्या मागावर पाठवून पाठलाग करुन जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सुरेश कान्हु ढोरे (वय ६६, रा. मोरया बिल्डिंग, पौड, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेंद्र रसाळ, सागर भिलारे, विलास पिंगळे यांचा जावई, हरीष चव्हाण व तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन सलगर, महेश पवार, दीपक पालके, संतोष डावलकर यांनी आरोपी राजेंद्र बाळू रसाळ Rajendra Balu Rasal (४०, रा. विठ्ठलवाडी पौड) याला शिताफीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पौड गावात जमीन गट नंबर ५५ मध्ये ५३ आर जमीन मालकीची आहे. त्याच्या शेजारील गट नंबर ७५ मध्ये त्यांनी अशोक सुभाषचंद्र कोठारी व कालीदास विजय मगर यांनी प्लॉटिंग केले आहे. त्यांनी गट नंबर ७५ मध्ये ४ आर क्षेत्र खरेदी केले असून त्यात मालकीचा बोर्ड लावला आहे. गट नंबर ७५ मध्ये राजेंद्र बाळु रसाळ याचे २ आर क्षेत्र आहे. परंतु रसाळ याच्या क्षेत्राच्या चुर्त:सीमा निश्चित नाहीत. या प्लॉटिंग क प्रोजेक्टची पाहणी हरीष चव्हाण हे करत असून प्लॉटिंग डेव्हलपमेंट राजेंद्र रसाळ करीत आहेत. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी फिर्यादी हे शेतामध्ये गेले होते. त्यांच्या मिळकतीच्या लगत पौड गावाचा जो गावओढा आहे, त्यामध्ये राजेंद्र रसाळ याने शाासनाचे परवानगीशिवाय जेसीबी मशीन लावून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडविण्याचे काम सुरु केले होते.

हे पाहिल्यावर त्यांनी आपल्या सागर व रितेश या दोन मुलांना फोन करुन कल्पना दिली. त्यांनी ते काम थांबविले. तेव्हा राजेंद्र रसाळ याने फिर्यादी यांचा मुलगा सागर याला फोन करुन तुझी जमीन जाग्यावरच राहील, तुमच्याकडे मी बघुन घेईल, तुम्ही हिशोबात रहा, अशी धमकी दिली. त्यानंतर ३ मार्च रोजी दुपारी सागर व रितेश ढोरे हे शेतामध्ये गेले असता त्यांना एक जण व चार महिला शेतात वावरत असल्याचे दिसले. त्यांनी फिर्यादी यांना सांगितले. त्यांनी राजेंद्र रसाळ, सागर भिलारे, विलास पिंगळे यांचा जावई, हरीश चव्हाण व तीन महिला असल्याचे सांगितले.

१३ मार्च रोजी सकाळी ते नेहमी प्रमाणे शेतात गेले होते. एक जण त्यांच्या शेतात घुसखोरी करुन त्यांनी लावलेल्या बोर्डच्या शेजारी खड्डे खोदत होता. त्यांना पाहून तो म्हणाला की, तुला याच खड्ड्यात घालून टाकतो, म्हणजे तुझा सारखा सारखा ताप व्हायचा नाही, असे म्हणत तो कोठारी यांच्या ऑफिसकडे निघुन गेला. ते मोटारसायकलवरुन घरी आले. तेव्हा रिक्षाचालक व ३ महिला यांनी रिक्षातून त्यांचा पाठलाग केला. ते मोटार सायकल लावून घरात गेले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये पाहू लागले. रिक्षाचालक त्यांच्या घराच्या दरवाजाचे शटर वर करुन घराकडे येणार्‍या गेटमधुन आत डोकावुन त्यांच्या जीवाचे बरेवाईट करण्याकरिता त्याचा शोध घेत होता.

त्यांनी आतमध्ये डोकावुन ठार मारण्याच्या धमक्या दिला. रिक्षाचालक त्यांच्या घरासमोर असताना सतत राजेंद्र चव्हाण, सागर भिलारे, विलास पिंगळे यांचा जावई, हरीश चव्हाण व तीन महिला फोनवरुन कोणाशीतरी बोलत होता. रिक्षाचालक हा त्यांच्या शेतालगत कोठारी यांचे प्लॉटिंग भिंतीलगत फिर्यादी यांच्याजवळ येऊन मला गट नंबर ७५ लगत असलेल्या ओढ्याचे नैसर्गिक प्रवाहामध्ये भिंत बांधु द्या, या कामाला आडवे याल तर याद राखा, मी गुन्हेगार आहे, तुम्हाला इथेच गाडून तुमचा जीव घेईल, अशी धमकी देत होता. फिर्यादी यांनी या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावरील वेळोवेळी काढलेले फोटो, त्यांनी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहामध्ये बांधकाम केलेले फोटो, नैसर्गिक ओढा असल्याबाबत पौड तहसिलदार यांचे आदेशातील नोटींग, तसेच फिर्यादी याच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज इतर आवश्यक पुराव्याची कागदपत्रे दिल्यानंतर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सचिन सलगर तपास करीत आहेत.

You may have missed