Pune Crime News | पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्नात आरोपीच्या भावावर गोळ्या झाडून कोयत्याने वार

Pune Crime News | Pune: Former corporator Vanraj Andekar shoots and stabs brother of accused in an attempt to avenge murder

पुणे : Pune Crime News | माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यात बुधवारी वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपीच्या भावावर गोळी झाडून कोयत्याने वार करण्याचा प्रकार समोर आला आहे.

अक्षय बापू मस्के ऊर्फ बाळा Akshay Bapu Maske alias Bala (वय २६, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, आंबेगाव पठार) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. ही घटना बालाजीनगर येथील संविधान चौकात बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली.

अक्षय मस्के हा वनराज आंदेकर खुन प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ आहे. त्यानेच मध्य प्रदेशातून पिस्तुले पुण्यात आणली होती.
अक्षय मस्के हा बुधवारी सकाळी बालाजीनगर येथे आला असताना दुचाकीवरुन आलेल्या चौघा जणांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याला लागली. त्यानंतर त्यांनी कोयत्याने अक्षयवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. अक्षय याला तातडीने जवळच्या भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या अगोदर आयुष कोमकर याचा खुन करण्यात आला होता. त्यानंतर एका आरोपीचा रिक्षाचालक भावाचा खुन करण्यात आला होता. हा तिसरा प्रयत्न आहे.

You may have missed